नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा,
अभिजीतरावांच नाव आहे एक लाख रुपये तोळा
शंकरच्या मंदिरात पिंड आहे गाभाऱ्यात
रामराव राहावे सदैव रहावे माझ्या हृदयांत
क्रिकेटच्या मैदानात करत होतो बॅटिंग
श्यामरावांन सोबत कोणी करेल का माझी सेटिंग
पावसाच्या पाण्याने नदी नाले तुडुंब भरले
गणेश च्या येण्याने माझे आयुष्य अजूनच बहरले
कमळ फुलतं पाण्यातल्या पाण्यात
रश्मी हसते माझी गालातल्या गालात
विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा
अहो, आता तरी मला प्रेमाने घास भरवा
प्रेमाच्या चौकटीला गुलाबाच्या फुलांची आरस
सगळ्या पाटील कुटुंबात कमळी माझी सरस
घराच्या अंगणात पडला परिजातचा सडा
नेहा सोबतच्या माझ्या संसाराला कधीच जाऊ नकोदे तडा
जेजुरीचा खंडोबा कोल्हापूर चा ज्योतिबा
रश्मी सोबतच्या संसारात अखंड राहूदे गोड आंबट मुरंबा
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवले परात
सुरेशरावांचं नाव घेते आता घ्या की हो घरात
आषाढी एकादशीला अखंड पंढरी च्या विठुरायाची आस
रामरावांसोबत अखंड राहो पंढरपूरच्या वारीचा ध्यास
आकाशात उडतो पक्षांचा थवा
रश्मीचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
खर्डी च्या शितलाई देवीच्या आशीर्वादाने जन्म झाला मनोरे घराण्यात
श्रीसद्गुरुकृपेने अंकितरावांच नाव घेऊन प्रवेश करते बिडवी परिवारात
वीस दशक दोनशे समास,
श्रीसमर्थ कृपेने अंकीतरावांसोबत अखंड राहो सहवास
दासबोधाची सुरवात मंगलाचरणाने,
अंकीतरावांसोबत माझी सुरवात दस्याभक्तीने
वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, दिपकरावांच्या साथीने होईल संसार सुंदर
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
सचिनराव आहे माझे जीवन-सर्वस्व,
देवळाला खरी शोभा कळसाने येते,
प्रतापराव मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
कळी हसेल, फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध
गणेशच्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा मध गोड
दिनेशचे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
मयुरेश चे नाव घेतो लग्नाच्या राती.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
रश्मी आजपासून माझी गृहमंत्री.
नंदनवनात अमृताचे कलश,
कल्याणी माझी आहे मोठी सालस.
काश्मीरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध
सीमाच्या जीवनात, मला आहे आनंद.
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी,
योगिताचे नाव घेतो मोऱ्यांच्या घरी.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
प्रियांका चे नाव घेतो सर्वांनी लक्षपूर्वक ऐका.
कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात,
समीरचे नाव घेतो आजच्या मेळाव्यात.
आंब्याच्या झाडावर, कोकीळा करी कूजन,
माझ्या नावाचे लक्ष्मी करी पूजन.
उगवला रवी मावळली रजनी,
सरस्वतीचे नाव सदैव वसे माझ्या मनी.
जाईजुईंच्या फुलांचा दरवळला सुगंध
लक्ष्मीच्या सहवासात झालो मी धुंद.

No comments:
Post a Comment